MAths and reasoning Questions. Solved in Marathi and English.
MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर २ – csat गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न आणि उत्तरे (मराठी)
SET A 2019.
Que 51. रेलगाड्यांसाठी कोकणात फक्त एकेरी मार्ग उपलब्ध आहे. ताशी 50 किमी (प्रती तास) इतक्या एकसमान गतीने प्रवास करणाऱ्या गाडीने ‘Ax’ हे स्थानक 100km असलेल्या ‘By’ या स्थानकावर पोहोचण्यासाठी सकाळी 7.40 ला सोडले. ताशी 40km(प्रती तास) या एकसमान गतीने प्रवास करणाऱ्या गाडीने ‘By’ हे स्थानक ‘Ax’ या स्थानकावर पोहोचण्यासाठी सकाळी 8.30 ला सोडले. वाहतूक नियंत्रकाच्या ही परिस्थिती सकाळी 8.40 ला लक्षात आली. या दोन गाड्यांची टक्कर टाळण्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी नियंत्रकाला गणिती हिशेबाने उपलब्ध असलेला कालावधी निवडा.
Only a single railway track is available for trains in konkan area. A train traveling with uniform speed of 50km per hr leaves station ‘Ax’ at 7.40 am to reach the station ‘By’, which is situated at a distance of 100km from ‘Ax’. At 8.10 am a train traveling with uniform speed of 40km per hr leaves station ‘By’ to reach the station ‘Ax’. The traffic controller noticed this situation at 8.40am. Select the time duration that the controller has mathematically, for making decision, for avoiding collision between these two trains.
1. 20 minutes
2. 19 minutes
3. 21 minutes
4. 15 minutes
Ans : 1. 20 minutes
Que 52. जया म्हणते, “मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली तर माझ्या आताच्या वयाची 14 पट मिळते. तर आतापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडा.”
Jaya says, ” When I add 6 times my age 6 years from now to 7 times my age 7 years from now, I get 14 times my current age. Select the option that indicates my age, after 5 years from now.”
1. 85 वर्ष / 85 years
2. 80 वर्ष / 80 Years
3. 95 वर्ष / 95 years
4. 90 वर्ष / 90 years
Ans : 4. 90 वर्ष / 90 years
Que 53. A, B, C, D, K, L, M व 0 हे संशोधक X, Y व Z या तीन वेगवेगळ्या संस्थांगत काम करतात. ते सौर ऊर्जा, शाश्वत विकास व शेतीच्या कामासाठी जलसुगी या तीन क्षेत्रांत ते काम करतात. कोणत्याही एका क्षेत्रात दोनपेक्षा कमी वा तीनपेक्षा जास्त व्यक्ती काम करत नाहीत आणि एका संस्थेत त्यांच्यापैकी तिघांपेक्षा जास्त व्यक्ती काम करत नाहीत. K हा जलसुगीत संशोधन करणाऱ्या B बरोबर शाश्वत विकासात Y या संस्थेत संशोधन करतो. A व M हे समान क्षेत्रात काम करतात पण शाश्वत विकासात नव्हे आणि Y या संस्थेत काम करत नाहीत. C हा संशोधक Z या संस्थेत, सौरऊर्जेत, फक्त D शाश्वत विकासात संशोधन करणाऱ्याबरोबर काम करतो. L हा जलसुगीत संशोधन करतो आणि A काम करतो त्या संस्थेत काम करत नाही. 0 हा सौरऊर्जा क्षेत्रात काम करत नाही. “कोणत्या संस्थेत/संस्थांत किमान एकतरी संशोधक सौरऊर्जा क्षेत्रात काम करतो?” याचे उत्तर देण्यासाठी पर्याय निवडा.
(1) Z वगळता सर्व
(2) Z व x दोन्ही
(3) Yव X दोन्ही
(4) फक्त x
A, B, C, D, K, L, M and O are researchers and are working in three different institutes, X, Y and Z. They are working in three different areas namely, solar energy, sustainable development, and rainwater harvesting for agricultural purpose. Not less than two or more than three researchers are working in the same area and not more than three of them are working the same institute. K is researching in the sustainable development in the institute Y with B who is doing research in rainwater harvesting. A and M are doing research in the same area but not in sustainable development and are not working in the institute Y. C is researching in solar energy in the institute Z only, with D who is working in sustainable development. L is researching in rainwater harvesting area and not working in the institute where A works. O is not doing research in the solar energy. Choose option for answering question, “In which of the institute/institutes at least one researcher is working in the area of solar energy ?
(1) All expect Z
(2) Both Z and X
(3) Both Y and X
(4) Only x
Ans : (2) Both Z and X
Que 54. सोबतच्या आकृतीत A, B, C, D व E या वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांचा नकाशा दाखविलेला आहे. तुमच्या निवडीच्या कोणत्याही वसाहतीपासून सुरुवात करून सातही मार्गांवरून एकदा आणि फक्त एकदाच चालावे लागेल अशा मार्गांची रचना करा. जेथून सुरुवात केली तेथेच शेवट व्हावा, ही अपेक्षा नाही. अशा मार्गांची सुरुवात किती ठिकाणांवरून करता येईल?
A road map connecting to the colonies A, B, C, D and E is shown. Design the route starting from any colony of your choice so that you will have to walk on each of the seven routes once and only once. The starting point and the end point may not be the same. From how many points, can such route be started?
- 1. एकही नाही / one
- 2. एक / One
- 3. दोन / Two
- 4. तीन / Three
Ans : 3. दोन / Two
Que 55.
Ans: 3
Que 56. मी पाली या गावात रहातो आणि मला जवळपास रहाणाऱ्या उपचार करुन घेणाऱ्या नेली, तेली आणि सेली या गावातील ग्राहकांना भेट द्यायची आहे. सर्व गावे द्विमार्गी रस्त्यांनी जोडलेली आहेत. पाली ते नेली मार्ग 31 किमी, तेली ते पाली 20 किमी, सेली ते पाली 22 किमी, नेली ते तेली 16 किमी, तेली ते सेली 18 किमी आणि सेली ते नेली 26 किमी या लांबीचे आहेत. सर्व ग्राहकांना भेटी देऊन पालीला परतण्यासाठी मला कापावे लागणारे किमान अंतर किमी मध्ये निवडा.
I live in a village Pali and I want to visit my therapy clients living in nearby villages Neli, Teli and Seli. All villages are connected by two way routes. The length of the route from Pali to Neli – 31km, Teli to Pali – 20km, Seli to Pali – 22km, Neli to Teli 16- km, Teli to Seli 18km, Seli to Neli 26km long. Select the minimum distance, that require to cover to visit my clients and return to Pali.
1. 84
2. 95
3. 97
4. 83
Ans : 1. 84
Que. 57) पुढील विधानांचे परीक्षण करा.
अ. ऊर्जेच्या विविध स्वरूपांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जिवाश्म इंधनांची गरज असते.
ब. अणु विखंडन वा विलिनीकरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्पादन करते.
क. जैव इंधनांचा वापर करत नसल्याने अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते.
ड. काटेकोरपणे व्यवस्थापन करून अणुकचऱ्याची समस्या सुटू शकते.
पुढील पर्यायांमधून वरील विधानांवर आधारलेले सर्वात उचित अनुमान निवडा.
पर्यायी उत्तरे:
(1) जैवइंधने वापरून निर्माण केलेली ऊर्जा विविध स्वरूपाच्या प्रदूषणांत भर टाकते.
(2) जैवइंधनांची गरज नसल्यामुळे अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे.
(3) काटेकोर कचरा व्यवस्थापन करता येत असल्यामुळे प्रदूषण समस्या तसेच जैवइंधनांचा वापर टाळून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळवण्याचा अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे.
(4) जैवाश्म इंधनांचा दुष्काळ तसेच ऊर्जेची कमतरता यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा निर्मिती करण्याला अन्य पर्याय नाही.
Examine the following statements :
a. Production of various forms of energy requires bio-fossil fuels in large quantities.
b. Atomic fission or fusion processes produce large amount of energy.
c. Atomic energy reduces pollution remarkably as it doesn’t use bio-fossil fuels.
d. Problem of atomic waste can be managed tactfully.
Select the option that is most appropriate inference based on above statements.
Answer Options :
(1) Energy produced using bio-fuels contribute towards pollution of various types. (2) Atomic energy is the better option as it doesn’t require bio-fuels. (3) Since waste can be managed tactfully, atomic energy is a better option to produce energy by avoiding aggravation of pollution and consumption of bio-fuels. (4) There is no better way other than producing atomic energy in large quantities for managing scarcity of fossil fuels and shortage of energy.
Ans : 3
Que. 58. दीर्घ मुदतीच्या कैद्यांना, तुरुंगातून सुटल्यानंतर, त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्यांना राज्य शासनाकडून पुरेसे निवृत्तीवेतन द्यावे असे सुचवले गेले आहे. हे म्हणजे गुन्ह्याबद्दलचे पारितोषिक वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी ही सूचना लगेचच धुडकावून लावली आहे. कैद्यांच्या निवृत्तीवेतनाची पाठराखण करणाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावणाऱ्यावर टीका करताना दावा केला आहे की या टीकाकारांनी हे ……. समजून घ्यायला हवे.
वरील विधानाची पूर्ती करणारा सर्वात तर्कसंगत पर्याय निवडा.
(1) गुन्हा प्रतिबंधापेक्षा गुन्हेगाराला शिक्षा मिळणे महत्त्वाचे आहे
(2) गुन्हाप्रतिबंध हा महत्त्वाचा प्रश्न नाही
(3) गुन्हा प्रतिबंधासाठी दूरगामी उपाय करणे महत्त्वाचे आहे
(4) तुरुंगातून सुटल्यानंतर काय होते याच्याशी कायद्याचा संबंध नाही
It has been suggested that long-term prisoners, on release from jail, be given a reasonable state pension to reduce the likelihood of their resorting to crime. Most
people instinctively reject the suggestion as they feel it would be like rewarding
criminal activity. The supporters of the prisoners’ pension scheme have criticized those who reject this possibility, by claiming that for the critics …
Select the most logical option for completing above sentence.
(1) punishment for criminals is more important than crime prevention.
(2) crime prevention is not an important issue.
(3) long-term solution for preventing crime is important.
(4) the law should not be concerned with what happens after jail.
Ans : C
Que 59.
Ans : 2
Que. 60.
Que 61.
Que 62.
Que 63.
Que 64.
Que 65.
Que 66. जर A$B चा अर्थ A हा B चा भाऊ आहे; A@B चा अर्थ A ही B ची बायको आहे; A#B चा अर्थ A ही B ची मुलगी आहे; A*B चा अर्थ A हे B चे वडील आहेत, तर W,T व Q ही भावंडे असल्याचे दर्शवणारी नातेसाखळी ओळखा.
A $ B means A is brother of B; A@B means A is wife of B; A#B means A is daughter of B; A*B means A is father of B, then select the relation chain that indicates W,T and Q are siblings
- P @ W $ Q * T # U
- P @ Q $ W * T # U
- P @ Q $ T # U * W
- P @ Q $ T # W * U
Ans : C